कृषी दिनानिमित्त केंद्रशाळा वेताळ बांबर्डे येथे वृक्षारोपण

कुडाळ : आज महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिवशी कृषी दिनाचे औचित्य साधून ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत केंद्रशाळा वेताळ बांबर्डे नंबर १ येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रदीप गावडे, नाईक भाऊजी, शाळा समिती अध्यक्ष सखाराम सावंत, समिती सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!