राष्ट्रीय स्तर परिषदेसाठी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची निवड

दिल्लीत ३-४ जुलैला होणार परिषद

कुडाळ : दिल्ली येथे होणाऱ्या शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांच्या राष्ट्रीय स्तरावरील परिषदेसाठी कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची निवड झाली असून ३ व ४ जुलै रोजी ही परिषद होणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर शहरी स्थानिक संस्थांच्या अध्यक्षांसाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य आणि संघराज्य प्रदेशामधील संस्थांसाठी ही परिषद असून सवैधानिक बळकटीकरणात शहरी संस्थांची भूमिका तसेच लोकशाही आणि राष्ट्र उभारणी या विषयांवर ही परिषद होणार आहे या परिषदेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांची निवड करण्यात आली आहे.

error: Content is protected !!