गुरुपौर्णिमेनिमित्त ” अक्कलकोट ” येथे जाणाऱ्या ” स्वामी भक्तांची ” फसवणूक सहन करणार नाही – राकेश कांदे ( माजी नगरसेवक )

कुडाळ येथील स्वामीभक्त गेली 25 वर्ष गुरु पौर्णिमेनिमित्त ” अक्कलकोट ” वारी करत असतात.. कुडाळ शहरातील स्वामीभक्त श्री प्रभाकर कुंटे तसेच इतर स्वामीभक्त दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट येथे जाण्यासाठी दि.८ जुलै रोजी कुडाळ डेपोची ( पणजी – अक्कलकोट ) गाडीचे रिझर्वेशन मिळण्याकरिता कुडाळ बस स्थानक आवारातील रिझर्वेशन काउंटर जवळ दि.२८ ला संपर्क केला असता सदर बस पूर्णतः फुल असण्याचे सांगण्यात आले.. तसेच दोन दिवसानंतर सुद्धा सदर ठिकाणी विचारणा केली असता गाडी फुल असल्याचे कारण सांगण्यात आले..त्यानंतर त्यांनी सदर गाडीत बुकिंग मिळण्याकरिता किंवा इतर गाडींचा पर्याय शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले ..

         काल बस डेपोत जाऊन त्या ठिकाणी रिझर्वेशन संदर्भात पाहणी केली असता त्याच तारखेला बसमध्ये तब्बल 20 ते 22 सीट खाली असल्याचे दिसून आले.. यानुसार आज स्वामी भक्तांसह माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी कुडाळ बस स्थानक आगार प्रमुख रोहित नाईक यांच्याशी चर्चा केली सदर रिजर्वेशन काउंटर वर उत्तर देणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. वीस ते बावीस सीटचे पैसे ( शासनाचे नुकसान ) पगारातून वसूल करण्यात यावे. आणि सदरच्या व्यक्तीला सदर काउंटरवर ठेवण्यात येऊ नये अशी मागणी केली .की जेणेकरून स्वामी भक्तांना आणि त्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे कोणताही त्रास होऊ नये आणि प्रवाशांना तसेच स्वामी भक्तांना समर्पक उत्तरे त्या ठिकाणी मिळावी असा कर्मचारी त्या ठिकाणी नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली. आणि याची दखल घेत तात्काळ बुकिंग देण्याच्या सूचना आगार प्रमुख रोहित नाईक यांनी रिझर्वेशन काउंटर कर्मचारी यांना दूरध्वनीवरून केल्या यावर पूर्ण नियंत्रण आगार व्यवस्थापक म्हणून तुमचा असले पाहिजे असेही आगार प्रमुखांना स्वामी भक्तांनी सांगितले व यापुढे अश्या कोणत्याही गोष्टी खपवून घेणार नाही असे सांगण्यात आले यावेळी श्री प्रभाकर कुंटें , पोखरणकर , गोलतकर यांच्यासह इतर स्वामीभक्त उपस्थित होते...*
error: Content is protected !!