मधुराज क्लिनिक वेताळ बांबर्डे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

कुडाळ : रविवार दिनांक 29/06/2025 वेताळ बांबर्डे तिठा माशेलकर कॉम्प्लेक्स, मधुराज क्लिनिकमध्ये डॉक्टर राजन राणे व डॉक्टर सौ रेखा राणे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होतं. या शिबिरामध्ये वैद्यकीय सेवा देण्यासाठी डॉक्टर जीटी राणे, डॉक्टर सौ सई राणे, डॉक्टर प्रियांशी कदम, डॉक्टर सौ रेखा राणे, डॉक्टर राजन राणे व त्यांचा स्टाफ उपस्थित होता.


शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, नेब्युलायझेशन, दातांची तपासणी, जनरल चेकअप, रक्त तपासणी, ई.सी.जी यांसारख्या सेवा तसेच रुग्णांना लागणारी सर्व औषधे मोफत पुरविण्यात आली.
या शिबिराच्या उद्घाटन समारंभाला सरपंच सौ वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे, रामदास गावडे, महादेव परब, बापू बांबर्डेकर, बंटी बांबर्डेकर, दिवाकर बांबार्डेकर, बाळा म्हापणकर, पिंटू दळवी, अरविंद बांबर्डेकर, दिलीप तीवरेकर, बाबा मुजावर, तन्वी गावडे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. या शिबिरामध्ये दुपारी 3. 30 pm वाजेपर्यंत 140 आणि दातांची 25 रुग्णांनी लाभ घेतला होता.

error: Content is protected !!