मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रसरकार आणि राज्यातील महायुती सरकार हे सर्वासामान्य जनतेचे सरकार आहे. विकासनिधी सोबत हजारो कोटी निधी जनकल्याणकारी योजनांसाठी मंजूर होत आहे. या योजना तळागळातील जनतेपर्यत पोहचत असताना कोणीही पात्र लाभार्थी वंचित राहता नये. याकडे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचे लक्ष असलेच पाहिजे. यासोबत विकासकामे व जनकल्याणकारी योजनेसाठी अधिकाधिक मागणी प्रस्ताव आले पाहिजेत. महायुती सरकारच्या माध्यमातून अधिकाधिक विकासनिधी खेचून आणण्यासाठी आम्ही कटीबद्ध राहू. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी पोईप येथे बोलताना केले.
ग्राम विकास व पंचायत राज विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण जिल्हा परिद निधुदुर्ग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सिंधुदुर्ग मालवण पंचायत समिती प्रधानमंत्री आवास योजना पंचायत समिती मालवण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना अंतर्गत महा आवास अभियान मालवण तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटी संचालित श्री. सिद्धिविनायक सभागृह येथे कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी गटविकास अधिकारी शाम चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, सरपंच श्रीधर नाईक, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शहर प्रमुख दीपक पाटकर, पंकज वर्दम यांसह अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पात्र लाभार्थी उपस्थित होते. अतिशय नियोजनबद्ध असा हा कार्यक्रम उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. विविध सन्मान यावेळी करण्यात आले. कार्यक्रम सूत्रसंचालन चंद्रसेन पाताडे यांनी केले.
पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, मोदी आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना नवीन सिंचन विहीर बांधणे तसेच पंधरावा वित्त आयोग अंतर्गत तीन वर्षात प्राप्त अनुदानातून सर्वाधिक रक्कम खर्च खर्च करणे. या अंतर्गत विविध सन्मान तसेच आधुनिक तंत्रज्ञान, नियोजनबद्ध व्यवस्थापन करुन आंबा उत्पादनामध्ये नवा विक्रम प्रस्थापित करत जागतिक स्तरावर हापूस आंब्याची प्रथम पेटी पाठविण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेले उपक्रमशील शेतकरी डॉ. उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांनाही सन्मानपत्र देण्यात आले.यासोबत जिल्हा राज्य स्तरावर उत्कृष्ट कामगिरी बजावणारे गट शिक्षणाधिकारी संजय माने व कार्यतत्पर गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांचा सत्कार आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांचे विशेष कौतुक आमदार निलेश राणे यांनी केले.
प्रास्ताविक करताना गटविकास अधिकारी शाम चव्हाण यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. घराकुल योजनेतून सर्वाधिक 932 लाभार्थी प्रस्ताव मंजूर झाले आहेत. रमाई योजनेचे 54 रस्ताव मंजूर झाले. सुमारे 20 कोटी पेक्षा जास्त निधी यासाठी मंजूर झाले. अन्य विविध योजनेतही मोठा निधी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती शाम चव्हाण यांनी दिली.
यावेळी माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनीही विचार मांडले. आमच्या हक्काचे आमदार निलेश राणे आहेत. त्यामुळे विकासनिधी मोठ्या प्रमाणात येत आहे. राणे साहेबांप्रमाणे आमदार निलेश राणे यांची कार्यशैली आहे. विधानसभेत त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे प्रत्येकाला अभिमान वाटावी अशी आहेत. त्यामुळे विकासाची गंगा अशीच सुरु राहील. पोईप येथील जुने धरण पाणी साठवण करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे आता त्या जागेचा वापर उद्योग इंडट्री उभरावीत करावा. अशी मागणी करण्यात आली. तर सध्या बसवण्यात येणारे स्मार्ट मिटर बाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. त्याबाबत लक्ष घालावे अशी मागणी केली. याला आमदार निलेश राणे यांनी तात्काळ प्रतिसाद देत वीज अधिकारी यांच्या सोबत बैठक बोलावली आहे.
आमदार निलेश राणे टॉप कर्तृत्व असलेले आमदार : दत्ता सामंत
आमदार निलेध राणे यांच्या माध्यमातून कोट्यावधी निधी आला. याठिकाणी पोईप हायस्कुल ला 35 लाख निधी खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला. लवकरच सर्व शाळेत वह्या वाटप आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून केले जाईल. पुढील वर्षी गरजू मुलांना सायकल वाटप करणार असे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले. तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकारी यांचे अभिनंदन केले.
मालवण पंचायत समिती ‘आदर्श’ मॉडेल बनवूया
मालवण पंचायत समिती माध्यमातून जनतेला 24 तास सेवा मिळाली पाहिजे. हेल्पलाईन तयार करा. सेवा सुविधा या माध्यमातून मालवण अग्रक्रमावर राहिले पाहिजे. यासाठी अधिकारी लोकप्रतिनिधी यांनी सर्वोत्तम योगदान द्या.आवाश्यक सर्व सहकार्य करण्यासाठी कटीबद्ध आहे. असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.