पोईप येथील सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल मध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात आमदार निलेश राणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
संतोष हिवाळेकर / पोईप
महा आवास अभियान ग्रामीण हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. या उपक्रमातील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था /व्यक्तींना महाआवास अभियान ग्रामीण पुरस्कार देण्याबाबत शासनाने कळविलेले आहे. या अभियानामध्ये मालवण तालुक्यातील खरारे पेंडूर ग्रामपंचायतीने उत्कृष्ट काम केल्याने प्रधानमंत्री आवास योजना/ रमाई आवास योजना/ मोदी आवास योजना ग्रामीणमध्ये तालुक्यामध्ये या ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.
या पुरस्काराचे वितरण कुडाळ मालवण विधानसभेचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते शनिवारी पोईप येथील सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप विरण येथे करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच नेहा परब ,उपसरपंच सुमिती सावंत, ग्रामपंचायत अधिकारी कोठावळे मॅडम ,ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पेडणेकर, अंकिता सावंत, वैष्णवी लाड, कर्मचारी अनिल पाटील, ऋषिकेश लाड आदींनी पुरस्कार स्वीकारला यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे ,अनिल कांदळकर ,संतोष साठविलकर ,राजेंद्र प्रभूदेसाई,राजा गावडे ,दीपक पाटकर ,गटविकास अधिकारी श्याम चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते