मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी घेतले श्री देव पाचोबा दर्शन

शिवसेना उपनेते संजय वसंत आग्रे यांची विशेष उपस्थिती

फलोत्पादन रोजगार हमी योजना व खारभुमी विकास मंत्री मा. भरतशेठ गोगावले यांनी नुकतीच डामरे येथील पवित्र पाचोबा देवस्थान येथे भेट देत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.

या भक्तिमय प्रसंगी शिवसेना उपनेते मा. संजय वसंत आग्रे यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या समवेत कणकवली विधानसभा प्रमुख संदेश पटेल, मंगेश गुरव, फोंडाघाट ग्रामपंचायत सदस्य पवन भोगले, तसेच पाचोबा मित्रमंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळेस देवाच्या चरणी सर्व जनतेच्या कल्याण, आरोग्य व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली.
मंत्रीमहोदयांच्या या भेटीमुळे परिसरात भक्तिभाव आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

error: Content is protected !!