आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी येथील मुलीला आर्थिक मदत

कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी शेटकरवाडी येथील कु. दीपस्वी दीपक पालकर हिला आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली.


दीपस्वी हिच्या उजव्या पायावर हल्लीच एक शस्त्रक्रिया झाली होती. तिला अधिक उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. सदर बाब आमदार निलेश राणे यांच्या कानावर घालताच निलेश राणे यांनी कुडाळचे तालुकाप्रमुख विनायक राणे यांना तत्काळ सूचना दिल्या. यानंतर विनायक राणे यांनी त्यांच्या घरी जात आर्थिक मदत सुपूर्त केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, ग्रामपंचायत सदस्य सागर रणसिंग, सचिन पालकर, प्रसन्ना गंगावणे, साई दळवी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!