मोबाईल लोकेशनच्या आधारे मोटारसायकल चोर ताब्यात

कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी

कुडाळ : कुंभारवाडी येथून फिर्यादी साईशिल्प गुरुदेव मांद्रेकर (वय 27 वर्षे, व्यवसाय शिल्पकार, रा. वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ) यांचे ताब्यातील व साक्षीदार संजय बाबु कुंभार (रा. कुडाळ) यांचे मालकीची टीव्हीएस एन्टोर 125 गाडी (नं. एम.एच.007. एक्यु. 8923) ही दुचाकी चोरुन नेल्या प्रकरणी कुडाळ पोलिसांनी तब्बल तीन महिन्यांनी संशयित आरोपित अनुज रमेश कावनकर (वय 25 वर्षे, रा.भोपण पंदेरी, ता. दापोली, जि रत्नागिरी) याला चोरलेल्या दुचाकीसह तुर्भे एमआयडीसी येथील एका मेडिकल कंपनीतून ताब्यात घेतले. याकामी मोबाईल लोकेशन तपासाचा वापर करण्यात आला. दरम्यान संशयिताला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्याला न्यायालयिन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान या प्रकरणाचा यशस्वी तपास करणाऱ्या पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

या बाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडाळ पोलीस ठाणे गुरनं. 0052/2025 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) या गुन्हयातील फिर्यादी साईशिल्प गुरुदेव मांद्रेकर (वय 27 वर्षे, व्यवसाय शिल्पकार, रा. वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ) यांचे ताब्यातील व साक्षीदार संजय बाबु कुंभार (रा. कुडाळ) यांचे मालकीची टीव्हीएस एन्टोर 125 गाडी (नं. एम.एच.007. एक्यु.8923) ही आरोपीत अनुज रमेश कावनकर, (वय 25 वर्षे, रा.भोपण पंदेरी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) याने दिनांक 01/03/2025 रोजी सकाळी 10.00 ते 19.00 वा.चे मुदतीत फिर्यादीचे संमत्तीशिवाय चोरुन नेली म्हणून फिर्यादी यांनी दिले तक्रारीवरुन दिनांक 03/03/2025 रोजी 14.11 वा. गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास एम.एल. शिंगाडे यांचेकडे देण्यात आलेला होता.

या गुन्हयाच्या तपासात, फिर्यादी तसेच साक्षीदार यांचेकडून आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत काहीही ठोस माहीती मिळून येत नव्हती. आरोपीत यांचेकडे पुर्वी मोबाईल नं. 8412053725 हा होता. परंतु आरोपीत याने गुन्हयातील स्कुटर चोरुन नेल्यापासून त्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्यांचे लोकेशन मिळत नव्हते. पंरतु तपासीक अंमलदार यांनी वारंवार त्याच्या मोबाईलच्या आयएमईआय नंबरवर सायबर सेल यांचेमार्फत लक्ष ठेवत होते. दिनांक 21/06/2025 रोजी आरोपीत याने तब्बल 3 महीन्यानंतर पुर्वीच्या मोबाईलमध्ये सिम नं.9272114762 हे सिम काही वेळाकरीता टाकून मोबाईलचा वापर काही वेळाकरीता केलेला होता. त्यामुळे आरोपीत यांचे लोकेशन प्राप्त झाले. त्यानंतर तात्काळ आरोपी यांचा त्यांचे मोबाईलचे लोकेशनप्रमाणे शोध घेणेकरीता तपासीक अंमलदार पोलीस हवालदार एम.एल. शिंगाडे सोबत पोलीस नाईक एफ.बी. बुथेलो यांना पोलीस अधीक्षक यांच्या पुर्व परवानगीने तपासाकरीता मोबाईल लोकेशनप्रमाणे तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई, येथे दिनांक 23/06/2025 रोजी पाठविण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक, सिंधुदूर्ग डॉ. श्री. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक, कुडाळ राजेंद्र मगदुम यांनी केलेल्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे या पोलीस पथकाने दिनांक 24/06/2025 रोजी तुर्भे पोलीस ठाणे, नवी मुंबई येथे हजर राहून त्यांचेकडून अंमलदार मिळवून त्यांचेमार्फत आरोपी अनुज रमेश कावनकर यांचा मोबाईल लोकेशनप्रमाणे तुर्भे पोलीस ठाणे येथील एमआयडीसी शोध सुरु करण्यात आला. आरोपीत यांचे मोबाईल लोकेशन हे सी टाईप (200 मिटर औरस चौरस एरिया) होते. त्यामुळे आरोपीत यांचा तुर्भे एमआयडीसीमध्ये नक्की ठावठिकाणा मिळून येत नव्हता. सदर गुन्हयाचे तपासीक अंमलदार व त्यांचे पथकाने चिकाटीने आजुबाजुच्या परिसरातील सर्व फॅक्टरीमध्ये शोध घेताना, दिनांक 24/06/2025 रोजी सायंकाळी एका मेडीकल कंपनीत सदर आरोपीत मुद्देमालासह मिळून आला. त्यास पथकाने ताब्यात घेवून कुडाळ न्यायालयात हजर करुन त्यास न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यास जिल्हा कारागृह, सावंतवाडी येथे जमा केलेले आहे.

या उघउकीस न आलेल्या प्रलंबित गुन्हयातील आरोपीत यास अटक करुन गुन्हयातील 40,000/-रु किंमतीची टीव्हीएस एन्टोर 125 गाडी हस्तगत करुन चांगली कामगीरी केली म्हणून तपासीक अंमलदार पोलीस हवालदार एम.एल. शिंगाडे व पोलीस नाईक एफ.बी. बुथेलो यांचे पोलीस अधीक्षक, सिंधुदूर्ग डॉ.श्री. मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक, कुडाळ राजेंद्र मगदुम यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस निरीक्षक, कुडाळ राजेंद्र मगदुम यांनी या पथकाला रोख रु.1000/- बक्षीस देवून गौरविले आहे.

error: Content is protected !!