कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित , श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण या विद्यालयात शनिवार दिनांक 21 जुन 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता इयत्ता 4थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न झाला. विद्यालयाची एस.एस.सी.100 टक्के निकालाची परंपरा आहे. तीच परंपरा एस.एस.सी.फेब्रुवारी मार्च 2025 च्या विद्यार्थ्यांनी राखली , निकाल शंभर टक्के लागला .संस्थेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे केंद्रात प्रथम तीन क्रमांक व सर्व विषयात प्रथम क्रमांक मिळविणार्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.सर्व विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले.विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय शिक्षकांच्या वतीने बक्षीस देण्यात आले, इयत्ता 4 थी ते इयत्ता 9 वी प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांनाही संस्थेच्या वतीने पारितोषिक देण्यात आली.तसेच शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाची माजी विद्यार्थीनी व सेवानिवृत्त महिला व बाल विकास अधिकारी,कुडाळ संचिता कुडाळकर(गिता चेंदवणकर) उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कसा वाढवावा यावर मार्गदर्शन केले.. तसेच वालावल केंद्रांत नविनच कार्यभार स्वीकारलेले केंद्र प्रमुखश्री.गोविंद चव्हाण सर यांचा सत्कार करण्यात आला त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण केले. संस्था सचिव श्री.अशोक राऊत यांनी विद्यार्थ्यांना व सर्व कर्मचारी वर्गाला प्रोत्साहन दिले व जास्तीत जास्त गुण वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आपल्या भाषणातून म्हणाले.यावेळी व्यासपिठावर संस्थेचे अध्यक्ष श्री.अरुणजी पोयरेकर, उपाध्यक्ष श्री.शदर शृंगारे, सचिव श्री.अशोक राऊत, खजिनदार श्री.अरुण अमरे, शाळा समिती अध्यक्ष श्री.देवेंद्र नाईक, तसेच संस्या कार्यकारणी सदस्य श्री.संजय रामचंद्र नाईक, शाळा समिती सदस्य श्री.संजय वासुदेव नाईक, संस्या सभासद प्रमोद नाईक, गोविंद भरडकर, मुख्याध्यापक श्री.माणिक पवार तसेच चेंदवण उपसरपंच श्री.माधव व सदस्य सौ.मेस्त्री, सौ.तेंडुलकर , सौ.पायरेकर कवठी पोलिस पाटील विठ्ठल राणे, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ सदस्य,आरोग्य विभागातील कर्मचारी,अंगणवाडी कर्मचारी जि.प.चेंदवण नं.1.मुख्याध्यापक श्री.मसुरकर, पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचल सौ. गवस यांनी केले व आभार प्रदर्शन श्री.धरणे यांनी केले.

चेंदवण हायस्कूल येथे गुणगौरव सोहळा
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










