१२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल
मुंबई : मराठी संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी घेऊन येत आहेत रॉक कच्छी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध संगीतकार क्रेटेक्स. ‘मराठी वाजलंच पाहिजे (MVP) म्युझिक फेस्टिव्हल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर २०२५ रोजी लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी, पुणे येथे करण्यात आले आहे. या फेस्टिव्हलचा उद्देश मराठी संगीताला एक नवा, आधुनिक चेहरा देत जागतिक मंचावर नेण्याचा आहे. पारंपरिक मराठी संगीत आणि आधुनिक संगीतशैलींचा संगम घडवून आणणारा हा फेस्टिव्हल महाराष्ट्रात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे.
या महोत्सवात ४० हून अधिक कलाकार सहभागी होणार असून, फ्युजन, हिप-हॉप, हाऊस, रॅप, इलेक्ट्रॉनिक अशा विविध संगीतशैलींमधून मराठी बीट्सवर प्रेक्षक थिरकणार आहेत. प्रमुख कलाकारांमध्ये क्रेटेक्स, रॉक कच्छी, संजू राठोड, श्रेया-वेदान्ग, पाट्या द डॉक, इयर डाउन, आणि एमसी गावठी यांचा समावेश आहे.
फेस्टिव्हलची ठळक वैशिष्ट्ये:
आंतरराष्ट्रीय दर्जाची साउंड व लाईटिंग व्यवस्था
आधुनिक म्युझिक प्रॉडक्शनसह मराठी गीतांचा संगम
तरुणाईसाठी खास डिझाइन केलेला स्टेज अनुभव
बुकमायशोवर ऑनलाईन तिकीट बुकिंग – ₹500 पासून सुरू. या कार्यक्रमाद्वारे मराठी संगीताला नव्या युगात नेण्याचा आणि तरुण पिढीला मराठी बीट्सची नवी अनुभूती देण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.
रॉक कच्छी MVP फेस्टिव्हल विषयी सांगतो, “हा फेस्टिव्हल म्हणजे आमचं स्वप्न – मराठी संगीताला ग्लोबल स्टेजवर न्यायचं. आम्ही आधुनिक ध्वनी, नव्या बीट्स आणि मराठी शब्दांचा संगम घडवतोय.”
संगीतकार क्रेटेक्स यांनी सांगितले, “आमचं ध्येय मराठी संगीताला फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभर पोहोचवण्याचं आहे. ‘मराठी वाजलंच पाहिजे’ हे आता फक्त वाक्य नाही, तर एक आंदोलन आहे.”
दिनांक: १२ ऑक्टोबर २०२५
स्थळ: लिबर्टी स्क्वेअर, फिनिक्स मार्केटसिटी, पुणे
वेळ: संध्याकाळी ४ वाजल्यापासून पुढे
तिकीट उपलब्ध: BookMyShow
Link : https://in.bookmyshow.com/events/mvp-marathi-vaajlach-pahije-music-festival/ET00460427

















 
	

 Subscribe
Subscribe









