Category बातम्या

कुसूर नळपाणी योजनेचा ठेकेदार निखिल घेवारी ब्लॅकलिस्ट

कुसूर नळपाणी योजनेतील हलगर्जीपणा ठेकेदाराला पडला महागात जिल्हा परिषदेची कारवाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रा.पा.पु.कार्यकारी अभियंता यांचे आदेश सिंधुदुर्ग : जल जीवन मिशन अंतर्गत वैभववाडी तालुक्यातील कुसुर मधलीवाडी नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार निखिल महादेव घेवारी, मु.पो. कणकवली यांनी…

ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा नं.२ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत चमकलेल्या १४ विद्यार्थ्यांचा गुणगौरव

सावंतवाडी/प्रतिनिधी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने सावंतवाडी येथील सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा नं.२ च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. गुणवत्ता यादीत आलेल्या या शाळेच्या १४ ही विद्यार्थ्यांचे प्रशालेत संघटनेच्या वतीने सन्मानचिन्ह…

वीणेवर अवतरले विठ्ठल-रुक्मिणी आषाढी एकादशीला भक्ती आणि कलेचा अनोखा संगम!

गडमठच्या चित्रकार श्रुती सुतारची वारकरी परंपरेला सर्जनशील अभिवादन.. तुळशीदास कुडतरकर / कणकवली आषाढी एकादशीच्या निमित्ताने वैभववाडी तालुक्यातील युवा चित्रकार श्रुती संतोष सुतार यांनी कॅनव्हासऐवजी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान मानल्या जाणाऱ्या वीणेवर भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांची आकर्षक चित्रे साकारून…

कणकवलीत व्यापारी शिष्टमंडळाची नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट

नव्या संकुलाबाबत तातडीने कार्यवाहीचे निर्देश कणकवली : अप्पासाहेब पटवर्धन चौक परिसरातील नगरपंचायत कणकवलीच्या मालकीच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या नव्या व्यापारी संकुलाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ व्यापारी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी शिष्टमंडळाने आज नगराध्यक्ष संदेश पारकर यांची भेट घेतली.…

बिग ब्रेकिंग ! अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

नीट परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून गेल्या एका महिन्यापासून दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली होती. याच मुद्यावरून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे देखील बेमुदत उपोषणाला बसले होते.…

महापुरुष तरुण मित्र मंडळ, आईनमळा यांच्या वतीने आयोजित वारकरी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न.

कुडाळ : महापुरुष तरुण मित्र मंडळ, आईनमळा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री देव वेतोबा मंदिर ते आईनमळा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर असा वारकरी दिंडी सोहळा अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल नामाच्या अखंड जयघोषात आणि हरिनामाच्या…

शाळांमधील वह्या-पुस्तकांची सक्ती बंद! जि.प. शिक्षण विभागाचा सर्व शाळांना आदेश

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या तक्रारीनंतर मोठा निर्णय शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना विशिष्ट दुकानातूनच वह्या, पुस्तके व इतर स्टेशनरी खरेदी करण्याची सक्ती करू नये, असा महत्त्वाचा आदेश जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या शिक्षण विभागाने काढला आहे.जि.प. सदस्य मा. श्री रुपेश अशोक पावसकर,…

विकास सोसायट्यांनी खत विक्रीचे लायसन्स तातडीने काढावीत – प्रकाश सावंत

कणकवली खरेदी-विक्री संघाची सर्वसाधारण सभा उत्साहात ; सभेत विविध विषयांवर झाली चर्चा कणकवली : कणकवली खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सभासदांना न्याय देण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. गेल्यावर्षी 22 विकास संस्थांना खत विक्री केली होती.मात्र, यावेळी लायसन्स नसलेल्या संस्थांना खत देता आले…

स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात अपघात

युवतीचा मृत्यू; युवक गंभीर जखमी सावंतवाडी – कोलगाव येथील घटना सावंतवाडी : स्विफ्ट कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली युवती जागीच ठार झाली तर दूचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कोलगाव…

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी

कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कुडाळ : दि. २४ जुलै २०२६ रोजी देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्याविरोधात इन्स्टाग्रामवरील एका अकाउंटवरून आक्षेपार्ह, अश्लील व बदनामीकारक भाषा वापरण्यात आल्याप्रकरणी नेरूर येथील एका मुलीविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल…

error: Content is protected !!