उष्माघातापासून बचावासाठी मार्गदर्शक सुचना

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत सुरु झालेला उन्हाळा आणि तापमानात होणारीवाढ लक्षात घेता नागरिकांनी उष्माघातापासून बचाव होण्याच्या दृष्टीने, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, शासनाकडून प्राप्त पुढील मार्गदर्शक सूचनांचे पालन…








