फोंडा : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला आणि सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राजेश कांदळगावकर (सिंधुदुर्ग जिल्हा उद्योग केंद्र प्रकल्प अधिकारी), प्राचार्य डॉ. पुरंधर नारे, सचिव शेखर लिंग्रंस, जगदीश राणे सर, सुंदर पारकर गुरुजी, बालाजी सुरवसे सर तसेच महाविद्यालयातील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा प्रेरणादायी सोहळ्यांची नितांत आवश्यकता आहे. पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आयोजकांचे आभार मानले.