मालवण : तालुक्यातील आडवली मालडी येथील उबाठा पक्षाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आमदार मा. निलेश राणे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
हा भव्य पक्षप्रवेश शिवसेना उपनेते संजय आंग्रे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी उपजिल्हाप्रमुख राजा गावडे, तालुका प्रमुख महेश राणे, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, युवा सेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, माजी नगरसेवक पाटकर, मधुरा तुळसकर (महिला आघाडी तालुकाप्रमुख) आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या हिंदुत्ववादी विचारधारेवर विश्वास ठेवून आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याच्या उद्देशाने सरपंच संदीप अडवलकर, उपसरपंच भक्ती साटम, सदस्य सोनाली पराडकर, ज्योती लाड, विष्णू घाडीगावकर तसेच उबाठा शाखाप्रमुखांनी पक्षप्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे मालवण तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी मजबूत झाली असून, आगामी काळात हे नवीन पदाधिकारी शिवसेनेच्या माध्यमातून गावच्या आणि जनतेच्या विकासासाठी कार्यरत राहतील. शिवसेनेच्या परिवारात नव्याने सामील झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.













