सिंधुदुर्गचे आरटीओ कार्यालय एजंटमुक्त करा – ऍड. तानाजी पालव

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याचे आरटीओ अधिकारीकार्यालयात एजंटचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे त्याचा फटका जिल्ह्यातील लोकांना बसत आहे. त्यामुळे कार्यालय एजंट मुक्त करण्यात यावे, अशी मागणी कुडाळ-हुमरमळा येथील अॅड. तानाजी पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी ९.४५ ची ड्युटी असताना सुद्धा १०.३० वाजल्या शिवाय कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे संबंधितांना सूचना देण्यात यावी, तसेच कार्यालय परिसरात सीसीटिव्ही लावण्यात यावा, तसेच बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात यावी, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालय हे एजंट युक्त बनलेले आहे. एजंट शिवाय कोणतेही काम केले जात नाही. यामागे काही अधिकाऱ्यांचा हात असल्याचा संशय आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन तात्काळ यावर योग्य ती उपाययोजना करणे तसेच उशिरा येणाऱ्या तसेच मनमानी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना रोखण्यासाठी त्या ठिकाणी तात्काळ सीसीटीव्ही व बायोमेट्रिक यंत्रणा बसवण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

error: Content is protected !!