Category बातम्या

स्वगणना करीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्हा जनगणनेचा शुभारंभ

सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय जनगणनेला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात झाली असून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वगणना करीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनगणनेचा शुभारंभ केला. या जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. कणकवली येथील पालकमंत्री यांच्या…

सांगिर्डेवाडी प्रभागात बरेच दिवस राखडलेले खड्डे बुजवण्याचे काम प्रगतीपथावर

नगरसेवक निलेश परब यांच्या यशस्वी पाठपुरावा कुडाळ : सांगिर्डेवाडी प्रभागात गेले अनेक दिवस खड्डे बुजवण्याचे काम रखडलेले होते.नगरसेवक निलेश परब यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर काम प्रगतीपथावर आहे. खड्ड्यांमुळे रोजच्या होणाऱ्या त्रासातून मुक्त केल्याबद्दल प्रभागातील ग्रामस्थांकडून नगरसेवक निलेश परब यांचे आभार मानून…

असरोंडीच्या तन्वी जंगले हिचे NMMS परीक्षेत यश

असरोंडी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, असरोंडी संचलित माध्यमिक विद्यामंदिर असरोंडीची विद्यार्थिनी कु. तन्वी समीर जंगले हिने NMMS परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. तिने NT – C प्रवर्गातून सिंधुदुर्गात प्रथम क्रमांक मिळवत ₹ ४८०००/- राष्ट्रीय शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. तिने…

उमेदवारी भरण्यापूर्वी प्रमोद जठार यांची घेतली खा.नारायण राणेंची भेट; घेतले शुभाशीर्वाद

कणकवली : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट…

नूतन ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चव्हाण यांनी घेतली पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांची भेट

कुडाळ : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 मध्ये बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य निवजे कृष्णा वामन चव्हाण यांनी पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांची भेट घेतली. यावेळी कृष्णा चव्हाण यांचे सभापती मिलिंद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी श्री अरविंद करलकर शिवसेना…

फोंडाघाट हवेलीनगर येथील रमेश विठ्ठल भोगटे यांचे निधन

कणकवली : फोंडाघाट परिसरातील एक ज्येष्ठ, मनमिळावू आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. हवेलीनगर, फोंडाघाट हवेलीनगर येथील रहिवासी रमेश विठ्ठल भोगटे (वय ६२)यांचे बुधवारी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी फोंडाघाट येथील स्मशानभूमीत…

NMMS परीक्षेत ‘आदर्श’ भरारी! अन्वय देसाई जिल्ह्यात चौथा; करंजे विद्यालयाचे देदिप्यमान यश

कणकवली : नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करंजे नागवे साकेडी पंचक्रोशीतील आदर्श विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील ८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, कुमार अन्वय अच्युत देसाई याने…

साप पकडताना सर्पमित्राला सर्पदंश

उपचारासाठी घेऊन जात असताना गाडीला अपघात देवगड : आरा येथे साप पकडताना एका सर्पमित्राला सापाने दंश केल्याची घटना घडली. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. राजेंद्र पंढरीनाथ पारकर (६४) असे या सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी…

error: Content is protected !!