अमरसेन सावंत यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

कुडाळ : पावशी मतदारसंघातून अमरसेन सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ते अधिकृत उमेदवार असून अनेक दिग्गज उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागून राहिले आहे.








