हुमरमळा वालावल गडगड्या नाल्यावर पक्का साकव व्हावा – अर्चना बंगे

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे याच्याकडे केली मागणी!

कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील गडगड्या नाल्यावरुन ये जा करणारी शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ जिव धोक्यात घालून ये जा करतात तरी या नाल्यावर पक्का काॅक्रीट साकव घालण्यात यावा अशी मागणी नेरुर देऊळवाडा दक्षिण पंचायत समिती मतदारसंघातुन निवडुन आलेल्या सदस्या अर्चना बंगे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

सौ. बंगे यांनी दीलेल्या पत्रामध्ये नमुद केले आहे की या नाल्याच्या प्रवाहातून देसाईवाडा व गाळवणेवाडी मधुन शाळकरी विद्यार्थी ग्रामस्थ शाळा व बाजार हाट करण्यासाठी ये जा करतात तसेच पावसाळ्यात या नाल्यावरुन जाताना शेवाळ पकडुन मुले पडतात आणि शाळेत ओल्या कपड्यांनी शाळेत जातात याचे गांभीर्य ओळखून येणाऱ्या नियोजन मंडळाच्या बैठकीत या साकवाला मंजुरी मिळावी अशी विनंती केली आहे.

error: Content is protected !!