Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

मनसेचा कोकणातील बडा नेता राज ठाकरेंची साथ सोडणार ?

मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर पक्षात नाराज असल्याची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात रंगू लागली आहे. ‘पक्षात निष्ठावंतांना कवडीचीही किंमत नसते’ या त्यांच्या स्टेट्समुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार का ? असा सवाल…

वैभववाडी येथे आग लागून लाखोंचे नुकसान

दोन गोठे जळून खाक वैभववाडी : सोनाली वाणीवाडी येथे लागलेल्या आगीत दोन गोठे जळून खाक झाले आहेत. यात पांडुरंग बोभाटे व रुपेश बोभाटे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका गोठ्यात असलेली २५ गुरे मात्र बालबाल बचावली आहेत. मात्र…

अमृत महाआवास अभियानात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

तर राज्यातील सर्वोत्कृष्ट तालुक्यात देवगड तालुकाही दुसऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन..! कणकवली : ‘अमृत महाआवास अभियान’ अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर या योजनेत सर्वोत्कृष्ट काम…

रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू

कुडाळ : तुकाराम सवाईराम चव्हाण (वय ३८ रा. सावगा, यवतमाळ) याचा शनिवारी सकाळी रेल्वेतून पडल्याने मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे सकाळी ७:२५ वाजता बाव नाईकवाडी रेल्वे ट्रॅक वर मृतदेह आढळला. याबाबतची खबर आसिफ खान कुडाळ मशीद मोहल्ला…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांनी दिल्या मंत्री भरत शेठ गोगावले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

महाड : शिवसेनेचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री (फलोत्पादन , रोजगार हमी योजना आणि खारभूमी विकास) मा. भरत शेठ गोगावले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे राज्य उपनेते संजय वसंत आग्रे यांनी महाड येथे भेटून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी संजय आग्रे यांनी सांगितले…

दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पत्नीचा मृत्यू

मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून उचलले पाऊल तळेबाजार-चांदोशी येथील घटना देवगड : मनोरुग्ण मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून तळेबाजार चांदोशी येथील संजय दाजी म्हापसेकर (६३) व त्यांची पत्नी सौ. कांचन संजय म्हापसेकर (५८) यांनी ३० मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास…

माजगावातील ३० वर्षीय युवकाचे निधन

सावंतवाडी : तालुक्यातील माजगाव कुंभारवाडा येथील विष्णू मंगेश चाफेलकर (३०) या युवकाचे शनिवारी सकाळी गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्याचे निधन झाले. त्याच्या अकाली निधनाचे वृत्त समजताच कुंभारवाडा परिसरात शोककाळा पसरली.…

कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील पार्किंग केलेली मोटरसायकल पळवणाऱ्या चोरट्याला केले गजाआड

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी कणकवली : शहरातील उड्डाणपुलाखालील दुचाकी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने दुचाकी चोरट्यासह चोरीस गेलेली दुचाकी ताब्यात घेतली आहे. देवगड जेटी येथे ही कारवाई करण्यात आली. शहरातील बसस्थानकासमोर उड्डाणपुलाखाली उभी केलेली दुचाकी (एमएच…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत व श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित तारका…

नृत्याचा सुरेख प्रवास… सिंधुदुर्ग : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी आपल्या विविध संकल्पनांमुळे जिल्ह्यात नेहमी चर्चेत असते. यावेळी देखील नेहमीप्रमाणेच ते तारका ही नवी संकल्पना दर्शकांच्या भेटीला घेऊन आले आहेत. यामध्ये आपल्याला नृत्याचा उगम ते नृत्याचा आजवरचा प्रवास पाहायला मिळणार आहे.…

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा ठरला प्रेरणेचा दीपोत्सव!

सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर यांचा स्तुत्य उपक्रम पणदूर (ता. कुडाळ) : शैक्षणिक गुणवत्ता आणि संगणक साक्षरतेच्या प्रसारासाठी कार्यरत असलेल्या सोहम कॉम्प्युटर एज्युकेशन, पणदूर यांच्या वतीने “गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा – सन्मान गुणवंतांचा” हा प्रेरणादायी कार्यक्रम शुक्रवार, ३० मे २०२५ रोजी…

error: Content is protected !!