कुडाळ : एस. टी. बस आगाराला प्राप्त झालेल्या ५ लालपरींचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला. कुडाळ एस. टी. बस आगाराला लालपरी बस मिळाव्यात म्हणून मागणी होत होती. ही मागणी आमदार निलेश राणे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तात्काळ कुडाळ एस. टी. बस आगारासाठी ५ लालपरी बसची पूर्तता केली. या बसेसचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, ओरोस मंडल अध्यक्ष दीपक नारकर आदी उपस्थित होते.
अत्याधुनिक सुविधा असलेल्या या बेसमध्ये युएसबी चार्जर, पुशबॅक सीट, हायड्रॉलिक सस्पेंशन आदी फीचर्स आहे. या नवीन बसेसमुळे कोकणवासीयांचा प्रवास आरामदायी व सुखकर होण्यास मदत होणार आहे.
यावेळी आ. निलेश राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की, मी कोणावरही टीका करणार नाही तर एसटीचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. तसेच कुडाळ शहरातील ऐरणीवर आलेला प्रश्न म्हणजेच ट्रॅफिक ची समस्या लवकरात लवकर सोडवणार असे आश्वासित केले.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी लालपरी मधून प्रवास करण्याचा आनंद घेतला. कुडाळ शहराला अत्याधुनिक बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह महायुती सरकारचे आभार मानले.
यावेळी कुडाळ आगारात नवीनच झालेल्या लाल परी बसेस पुढील प्रवासासाठी कुडाळ येथून रवाना झाल्या.















