घरावर वीज पडून लाखोंचे नुकसान

सावंतवाडी तालुक्यातील घटना

ओटवणे : रात्री कोसळत असणारा जोरदार पाऊस आणि गडगडाट याचा फटका गवळी वाडी येथील सुनीता बुराण यांना बसला असून येथील सुनीता सुरेश बुराण यांच्या घरावर वीज पडून लाखो रुपयाची हानी झाली. रात्री अचानक झोपेत असताना आलेल्या गडागडाटामुळे वीज कडाडल्याचा मोठा आवाज झाला घरात अचानक मोठा प्रकाश पडल्याने नक्कीच घरावर वीज पडली याचा अंदाज आल्याने त्या घाबरल्या काय करायचे हे सुचत नव्हते अशा प्रसंगात प्रसंगावधान राखत त्यानी बाहेर धाव घेतली केवळ दैव बलवत्तर म्हणून त्या यातून वाचल्या.

त्यांच्या शेजारीच राहणारे त्याचे पुतणे जाऊ घाबरून बाहेर आल्या. त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी घाबरलेल्या सुनीता बुराण हिला धीर दिला. घटनेत वीज मिटर पुर्णता जळून खाख झाला घरातील संपूर्ण लाईट फिटिंग जळून तुकडे होवून जमिनीवर पडली. याच बरोबर घरावर वीज पडल्याने घराच्या भिंती छप्पर यांचे मोठे नुकसान झाले यात त्यांच्या शेजारी राहणाऱ्या त्यांच्या जाऊ सुवर्णा नारायण बुराण यांनाही याचा फटका बसला त्यांच्या घराचे उबले अक्षरशः कोसळून पडले अचानक घडलेल्या या घटनेमुळे बुराण या घाबरून गेल्या असून त्यांची परिस्थिती ही बेताचीच असल्याने घटनेत झालेल्या नूकसानी बाबत पंचनामा होऊन योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!