नांदगाव येथे वृद्धेचा मृतदेह आढळला विहिरीत

कणकवली : नांदगाव, पाटीलवाडी येथील सुलोचना दत्ताराम नांदगावकर (७६) या वृद्ध महिलेचा घरांच्या पाठीमागे कठडा नसलेल्या विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास तिचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आला.

याबाबतची माहिती तिचे पती दत्ताराम शांताराम नांदगावकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. बुधवारी रात्री दत्ताराम व त्यांची पत्नी सुलोचना नांदगावकर हे जेवण करून झोपले होते. रात्री पाऊण वाजण्याच्या सुमारास दत्ताराम यांना त्यांची पत्नी अंथरुणात दिसून आली नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यात आला. पण, काळोखात त्या कुठेही आढळल्या नाही. गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रतिभा नांदगावकर यांना सुलोचना यांचा मृतदेह विहिरीतील पाण्यात तरंगताना दिसून आला. तिने कुटुंबीयांना त्याबाबत माहिती दिली. पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. सुलोचना यांची मानसिक स्थिती बिघडलेली होती. त्यांना रात्री-घराबाहेर जाण्याची सवय होता. या घटनेची आकंस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.

error: Content is protected !!