संचलनामध्ये कणकवली पोलीस ठाण्याचे अधिकारी -अंमलदार व सीआयएसएफ चे अधिकारी व 40जवानांचा समावेश
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले संचलन
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली पोलीस ठाण्याच्या वतीने तालुक्यातील खारेपाटण शहरात व येथील बाजारपेठेत महाराष्ट्र पोलीस दल सिंधुदुर्गच्या कणकवली पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस निरीक्षक श्री जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस उपनिरीक्षक श्री हडळ, खारेपाटण दूरक्षेत्र चे पोलीस अंमलदार -पराग मोहिते, व कणकवली पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी व सी आय एस एफ चे 2अधिकारी व ४0 जवानांच्या वतीने आज खारेपाटण येथे संचलन करण्यात आले.
राज्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था चोख राहण्याच्या दृष्टीने तसेच समाजात शांतता राहण्याच्या उद्देशाने आज खारेपाटण एस टी बस स्थानक ते खारेपाटण बाजारपेठ मार्गे घोडेपाथर बंदर बंदरवाडी पर्यंत पोलिसांनी संचलन केले.यावेळी खारेपाटण पोलीस दुराक्षेत्राचे पोलीस अंमलदार श्री पराग मोहिते व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच केंद्र सरकारच्या सी एस एफ एच सुरक्षा दलाचे जवान उपस्थित होते.