युवकाचा वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू

दोडामार्ग : दि. २१ मे प्रतिनिधी कळणे येथील युवक प्रताप रामराव देसाई वय वर्षे २८ हा बुधवारी दुपारनंतर घरात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गेला असता वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. त्याला शॉक लागल्यावर दोडामार्ग रूग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वी निधन झाले होते. युवकाच्या या अपघाती निधनामुळे संपूर्ण कळणे गावात शोककळा पसरली आहे. गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रताप देसाई हा गोवा राज्यातील एका कंपनीत कामाला होता.

कळणे डबीवाडी येथील प्रताप देसाई हा युवक घरात साफसफाई व इतर कामे करत होता. याचवेळी तो वीज पुरवठा सुरू करायला गेला तेव्हा त्याला झटका लागून खाली पडला. घरातील भाऊ इतर आवाज आला म्हणून बघायला गेले तर शॉक लागला हे लक्षात आले. वीज पुरवठा बंद करून कळणे सरपंच तसेच ग्रामस्थ यांनी तातडीने दोडामार्ग रुग्णालय येथे दाखल केले. पण काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्रताप देसाई यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे. नुकताच प्रताप देसाई व भाऊ काम करुन आपला उदरनिर्वाह करत होते. त्याच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे.

प्रताप देसाई यांच्या निधनाचे वृत समजताच शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, भाजपचे दोडामार्ग तालुका प्रमुख दिपक गवस, पराशर सावंत, कळणे सरपंच अजित देसाई, शेतकरी संघटना अध्यक्ष देसाई, गणेश धुरी, इतर ग्रामस्थ यांनी दोडामार्ग रुग्णालय दाखल झाले. अखेर प्रताप देसाई यांच्या भावाने दोडामार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या नंतर पोलीस दोडामार्ग रुग्णालय दाखल झाले. पंचनामा केला.

error: Content is protected !!