प्रसन्ना गंगावणे यांचे कुडाळ पोलीसांना निवेदन..
कुडाळ : मुंबई- गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस रोडवर अनधिकृतपणे डंपर पार्किंग करत आहेत.त्यामुळे तेथील वाहतूकीस व रहदारीस अडथळा होत असल्याचे दिसून येत आहे.तरी लवकरात लवकर मुंबई- गोवा हायवे ते गुढीपूर येथे सर्विस रोडवर अनधिकृत डंपर पार्किंगवर कारवाई करण्यात यावी.अशी मागणी गुढीपूर येथील रहिवाशी प्रसन्ना गंगावणे यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना निवेदनाद्वारे कारवाई करण्याची मागणी केली आहे.