कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात वसलेल्या हळदीचे नेरूर या गावची सुकन्या असणाऱ्या कु. अनिशा आनंद पालकर हिने सी.बी.एस.सी. बोर्डात ९९.३० % गुण मिळवत भारतात तिसऱ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळवला आहे. तिला इंग्लिश, मराठी व गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले असून विज्ञान व माहिती तंत्रज्ञान या विषयात प्रत्येकी ९९ गुण मिळाले आहेत. सी.बी.एस.सी. सारख्या अवघड परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.