पोटहिस्सा जमीन खरेदी करण्याच्या नियमांमध्ये बदल

ब्युरो न्यूज: कोणत्याही जमिनीचा पोटहिस्सा आपण खरेदी करणार असाल तर त्याचा नकाशा असल्याशिवाय यापुढे तुमचा खरेदी दस्तच होणार नाही. शासनाने मुद्रांक विभागास तसे आदेश दिले आहेत.अनेक जिल्ह्यांत असे नकाशे मिळत नसल्याने खरेदी दस्ताची कामे ठप्प झाली आहेत. राज्य शासनाने २८ एप्रिल २०२५ ला राजपत्र प्रसिद्ध केले.मालमत्तेची ओळख पटण्याइतपत तिचे पुरेसे वर्णन हवे, या पोटनियमात बदल करून पोटहिश्श्याच्या नकाशाची सक्ती केली आहे. राज्यभरात असे नकाशे लोकांकडे आहेत की नाही, याचा विचार न करताच कायदा केल्याने तारांबळ उडाली आहे.

error: Content is protected !!