बालगोपाळांनी लुटला पावसात भिजण्याचा आनंद
कुडाळ : कुडाळात आज सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने आपली हजेरी लावली. यावेळी बालगोपाळांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.
गेल्या अनेक दिवसांपासून सर्वच जण गरमीने त्रस्त झाले होते. सर्वांच्याच अंगाची अक्षरशः लाहीलाही होत होती. आज सायंकाळी अवकाळी पावसाने आपली हजेरी लावत धरणी मातेसह सर्वांच्याच मनाची तृष्णा शांत केली. यावेळी लहान मुलांना या पावसात खेळण्याचा मोह आवरला नाही. लहान मुलांनी पावसात भिजत आपला आनंद व्यक्त केला.

Subscribe










