सिंधुदुर्गनगरी: वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित वन्यजीवांचे अवयव किंवा अवशेष (मृगयचिन्हे), अंबरग्रीस (Ambergris) / व्हेल वॉमिट अथवा इतर वन्यजीव साहित्य यांचा ताबा, साठवण, विक्री किंवा वाहतूक करणे दंडनीय अपराध आहे. तसेच वन्यप्राण्यांपासून मिळणारे कोणतेही वन्यजीव अवशेष / वन्यजीव पदार्थ हे वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 अंतर्गत संरक्षित आहेत. त्यामुळे अशा वस्तूंना कायद्यानुसार शासकीय मालमत्ता मानले जाते. तरी अशा वस्तू सापडल्यास त्या सावंतवाडी वन विभागाकडे स्वखुशीने व स्वेच्छेने जमा कराव्यात असे आवाहन, सावंतवाडीचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) मिलीश शर्मा यांनी केले आहे.
जर कोणाकडे अंबरग्रीस, वन्यजीव अवशेष, शिंगे, कातडी, दात, नखे किंवा इतर वन्यजीव अवशेष असल्यास त्यांनी ते स्वखुशीने व स्वेच्छेने जवळच्या वनकार्यालयात जमा करावेत, नागरिकांनी अशा वस्तूंची खरेदी विक्री, लपवणूक किंवा वाहतूक करु नये अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. तसेच वन्यजीव अवयवांच्या अवैध व्यापारासंदर्भात कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी दूरध्वनी क्रमांक 02363-272005 वर संपर्क साधावा, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, तरी नागरिकांनी वन विभागास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शर्मा यांनी केले आहे.
1
/
93
माझी ओळख ही माझ्या आवशीमुळे
रामेश्वर स्टोअर्स कुडाळ येथे केवा कायपो इंडस्ट्रीजचा शुभारंभ #kudal #marketing #retail
झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंग साठा पूर्णपणे बेकायदेशीर #vaibhavnaik #sindhudurg
बापाशीन एकट्यान काम करायचा आणि तुम्ही बसान खातालात | आवस आणि झिलाची भांडणा
एसीबी चौकशीवर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया #vaibhavnaik #sindhudurg
पाट - म्हापण रस्त्यावर पहिल्याच पावसात साचलं पाणी #patmhapan
नाटकवेडा सत्तू अर्थात "आवस आणि झिलाची" एक्सक्लुझिव्ह मुलाखत
माझा प्रभाग माझी जबाबदारी गेली कुठे - विलास कुडाळकर #kudal #sindhudurg
रक्तदान करण्याबाबत मंदार गावडे यांचे कळकळीचे आवाहन #blood #bloodbank #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभव नाईकांना चोख प्रत्युत्तर #niteshrane #nileshrane #vaibhavnaik
निलेश राणेंच्या आरोपाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे - वैभव नाईक
आमदार निलेश राणेंची स्फोटक पत्रकार परिषद | Nilesh Rane #nileshrane
1
/
93


Subscribe










