वालावल ते कवठी रस्त्याची झालेली दुर्दशा! मंगळवार १२ मे रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे रास्ता रोको!

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा इशारा!

कुडाळ : वालावल ते कवठी पर्यंत रस्त्याची झालेली दुरदशा लोक आणि वाहानधारकांचे होणारे हाल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत या बाबत लक्ष वेधण्यासाठी मंगळवार १२ रोजी सकाळी ९ वाजता वालावल येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ व जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्याचा इशारा वालावल पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे बंगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दीला आहे
सौ बंगे यांनी दीलेल्या निवेदनात म्हटले आहे की वालावल चेंदवण कवठी रस्ता एवढा खराब होऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग गप्प का? असा सवाल करुन सौ बंगे म्हणाल्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाले असुन ग्रामस्थांना चालत जाणे कठीण झाले असुन वाहन धारकांचे कंबरडे मोडी पर्यंत हा रस्ता म्हणजे मृत्यू चा साफळा बनला आहे असे सांगून सौ बंगे म्हणाल्या आम्ही रस्त्यावर उतरण्याची वाट बांधकाम विभागाने बघत बसु नये म्हणून या बाबत लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर, नेरुर जिल्हा परिषद शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख श्री शेखर गावडे, उपविभाग प्रमुख श्री मंगेश बांदेकर, युवासेनेचे सुनिल करवडकर, युवासेनेचे विभाग प्रमुख मितेश वालावलकर यांच्या उपस्थितीत रास्तारोको करण्याचा इशारा सौ बंगे यांनी दीला आहे

error: Content is protected !!