शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे दिनांक ६ मे २०२५ च्या शासन निर्णयाप्रमाणे यावर्षीपासून इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्याची योजना असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. कला, वाणिज्य विज्ञान शाखेच्या सर्व जागा ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येणार असून खाजगी शाळांमधील व्यवस्थापनासाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेले आहे. त्या सुद्धा ऑनलाईन पद्धतीने गुणवत्ते नुसार भरण्यात येतील त्याचप्रमाणे इन हाऊस कोटा १० टक्के असून या जागा सुद्धा गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहे.
अकरावी प्रवेशासाठी आरक्षणाचे तत्व लागू असून समांतर आरक्षण लागू असणार आहे महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत, दिव्यांग ४ टक्के, प्रकल्प ग्रस्त २ टक्के, खेळाडू ५ टक्के, अनाथ विद्यार्थी १ टक्का, या प्रमाणे जागा राखीव रहातील. ८ मे पासून कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी सुरू झाली आहे.. विद्यार्थी नोंदणी १९ मे ते २८ मे २०२५ या कालावधीत होईल, त्याचप्रमाणे ज्या शाळेमध्ये विद्यार्थी दहावी उत्तीर्ण होईल त्या शाळेने सदर विद्यार्थ्यांचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून देण्याबाबतच्या सूचना आहेत यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्वतयारी झाली असून सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक यांना सभा घेऊन सूचना देण्यात आलेले आहे … विद्यार्थी नोंदणी करण्याकरिता SSC गुणपत्रक, TC, जातीचा दाखला, (विद्यार्थ्याचा नसेल तर वडिलांचा चालेल), ही कागदपत्रे लागतील, तसेच ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे.
ती कागदपत्रे, लागतील शिक्षण अधिकारी माध्यमिक, प्राथमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागात ११वी प्रवेश नियंत्रण समिती गठित करण्यात आली असून या समिती द्वारा सर्व प्रवेश प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यात येईल… अशी माहिती देण्यात आली आहे.