संतोष हिवाळेकर/ पोईप
पोईप गावचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर श्रीधर पोईपकर यांनी आपले वडील कै. श्रीधर पोईपकर यांच्या स्मरणार्थ जि. प. केंद्र शाळा पोईप मधील विद्यार्थ्यांना दप्तर (स्कूल बॅग) देणगी दाखल दिल्या. या स्कूल बॅगचे वितरण पोईप गावप्रमुख परशुराम नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात परशुराम नाईक यांच्या समवेत माजी उपसरपंच संदीप सावंत, पोईप ग्रापचे उपसरपंच संपदा सावंत, शाळा समिती अध्यक्ष सोनिया चव्हाण, केंद्र मुख्याध्यापक विकास घाडीगावकर, सहाय्यक शिक्षिका अश्विनी पांचाळ, सिद्धी परब, प्रमोद पाटील, प्रसाद चव्हाण पत्रकार संजय माने व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक पालक संघ सदस्य, ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना केंद्रमुख्याध्यापक विकास घाडीगावकर म्हणाले की पोईप गावचे रहिवासी तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर पोईपकर यांचे घराणे शिक्षण प्रेमी असून त्यांचे वडील कै.श्रीधर पोईपकर हे शिक्षकी पेशातून सेवानिवृत्त झाले होते. वडिलांचा वारसा त्यांचे पुत्र प्रभाकर पोईपकर यांनी चालविला असून जि.प.केंद्र शाळा पोईप मधील विद्यार्थ्यांसाठी 43 स्कूल बॅग तसेच प्रशालेच्या अंगणातील फेवर ब्लॉक साठी 25000 रुपयांची रोख देणगी दिली. याबाबत पोईप ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने प्रभाकर पोईपकर आणि कुटुंबियांना धन्यवाद देऊन आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन मुख्याध्यापक विकास घाडीगावकर यांनी तर आभार प्रशालेचे माजी विद्यार्थी तथा उपक्रमशील शिक्षक प्रमोद पाटील यांनी केले.













