रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण

दिवंगत हौसाआई बंडू आठवले, सकुताई आठवले महिला रोजगार संघ यांचे विशेष सहकार्य

कुडाळ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग अंतर्गत आणि दिवंगत हौसाआई बंडू आठवले, सकुताई आठवले महिला रोजगार संघ यांच्या वतीने सिंधुदुर्गातील महिला आर्थिक बाबतीत सक्षम होण्याकरिता गावोगावी जाऊन महिलांना मोफत व्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामुळे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी आपणास मिळणार आहे. त्यासाठी लागणारी उपकरणे आपणास संस्थेमार्फत पुरवण्यात येणार आहेत तसेच शासनाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त महिलाना या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सृष्टी परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक तथा आरपीआयचे कोकण प्रदेश सेक्रेटरी रतनभाऊ कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!