शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख रामचंद्र परब यांची उपस्थिती
कुडाळ : शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना भजन संघटना जिल्हाप्रमुख तथा उपजिल्हा संघटक रामचंद्र परब यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी आज जांभवडे येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिक पदाधिकारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी जांभवडे येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी बैठकीस शिवसेना उपतालुका संघटक पांडुरंग मेस्त्री, आंब्रड विभागीय संघटक विठ्ठल कदम, उपविभागप्रमुख सुधाकर देशमुख, जनार्दन मडव, शाखाप्रमुख कुपवडे अजित परब, युवा विभागप्रमुख अमोल गावकर, बुथप्रमुख कुपवडे संजय गावकर, निलेश मडव, जांभवडे बूथप्रमुख चंद्रकांत परब, भरणी बुथप्रमुख, कृष्णा मडव, अनंत मडव, प्रदीप मडव, चंद्रकांत मडव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी सर्वांनी महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचा एकमुखी निर्धार सर्वांनी केला.