जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे रंगभरण स्पर्धा उत्स्फुर्त सहभागात संपन्न.

कुडाळ : रविवार दि- १०/११/२०२४ रोजी श्री.सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट,पिंगुळी.. संचलित जिव्हाळा सेवाश्रमात इयत्ता पहिली ते चौथी गटात रंगभरण स्पर्धा घेण्यात आली.या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन शारदामाता,शिवाजी महाराजांच्या मुर्तींना पुष्पहार अर्पुन करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्ष श्री.सुरेश बिर्जे,स्पर्धेचे परीक्षक अमोल गोसावी सर, डॉ.ओरसकर, उमेश देसाई,बाबा गावडे,जयप्रकाश प्रभू,अरुण परब उपस्थित होते. तसेच दत्तात्रय पाटकर, दिपाली पाटकर, पुनम बिर्जे, शोभा बिर्जे, संजय बिर्जे, संदिप बिर्जे ,गिंताजली बिर्जे, आर्या बिर्जे,पालक मधुकर खडपकर,दादा करलकर,प्रकाश गावडे,अनिल चिचकर,रघुनाथ आळवे आदी बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होते.सुत्रसंचलन सुंदर मेस्त्री, प्रस्तावना संतोष सांगळे तर अध्यक्ष सुरेशदादा बिर्जे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर रंगभरण स्पर्धेला सुरवात करण्यात आली.स्पर्धेनंतर कु.सोहम संदीप बिर्जे याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यानंतर विद्यार्थी,पालक वर्गांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. दुपार नंतर बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष श्री.सुरेश बिर्जे,परीक्षक श्री.अमोल गोसावी सर, सुंदर मेस्र्ती,डाॅ.ओरसकर,बाबा गावडे,उमेश देसाई,मिनाक्षी गावडे,अनिल चिचकर उपस्थित होते.रंगभरण स्पर्धेत एकोणपन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.या स्पर्धेत प्रथम- कु.रुजुल योगेश सातोसे,द्वितीय- कु.रुही रघुनाथ आळवे,तृतीय-दुर्वांक्षा जयराम धुरी आणि उत्तेजनार्थ-कु.सुमेध संदीप बिर्जे यांनी पटकावला.

विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,प्रमाणपत्र,भेटवस्तु तसेच इतर सहभागी सर्वच स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र,भेटवस्तु वितरीत करण्यात आले.उपस्थितांचे आभार श्री.संतोष सांगळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *