मुंबई : कोकणी माणूस कधीही संकटात असेल तर त्या कुटुंबासाठी हक्काने धाऊन येणारे कुटुंब म्हणजे राणे कुटुंब… आज पुन्हा एकदा याची प्रचिती आली.
नेरूर, देऊळवाडा येथील रहिवासी अर्चना प्रशांत नेरुरकर (सध्या राहणार सर्वोदय नगर रोड, जंगल – मंगल रोड, भांडुप – पश्चिम) यांच्या एका महिन्याच्या मुलाला आतडीला सूज येऊन त्या ठिकाणी फाटली गेली. या मुलाचे वडील त्यांनी प्रशांत नेरुरकर यांनी या मुलाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता. या मुलावर तत्काळ शस्त्रक्रिया होणे गरजेचे असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. परंतु या शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च तब्बल ७ लाख ५० हजार एवढा होता. नेरुरकर यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने एवढा खर्च करणे त्यांना शक्य नव्हते. जेव्हा एखादी व्यक्ती संकटात सापडल्यावर सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा परमेश्वर नावाचा आशेचा किरण त्या व्यक्तीला दिसतो. त्याचप्रमाणे कोकणी माणूस संकटात सापडतो तेव्हा कोकणी माणसासाठी एकच आशेचा किरण असतो तो म्हणजे राणे कुटुंबीय… नेरुरकर यांनी ही गोष्ट विनय परब यांच्या माध्यमातून आ. निलेश राणे यांच्या कानावर घातली. आ. निलेश राणे त्यांच्यासाठी संकटमोचन बनून आले. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाशी बोलून बिलाची रक्कम कमी करून दिली.
आजवर आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून अनेक जणांच्या लाखो रुपयांच्या शस्त्रक्रिया कधी मोफत तर कधी अगदी कमी किमतीत करून देण्यात आल्या आहेत. आ. निलेश राणे यांनी केलेल्या या बहुमूल्य सहकार्याबद्दल नेरुरकर कुटुंबीयांनी त्यांचे मनापासून आभार मानले. कालच्या या घटनेनंतर आ. निलेश राणे यांच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला असून हृदयातून एकच स्वर उमटतोय. “एक ही तो दिल है साहेब, कितनी बार जितोगे”


Subscribe







