आरोंदा नाईकवाडीत मुलाने काढले आईला धक्के मारुन व शिवीगाळ करुन घरातुन बाहेर

आरोंदा ग्रामपंचायतीने सामाईक जमिनीत घराला परवानगी देताना केला चुकीचा ठराव!

याच ग्रामपंचायतीच्या मुजोरीगीरीला कंटाळून अखेर वयोवृद्ध सरस्वती निवजेकर यांनी सुरू केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण..

तर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा वयोवृद्ध सरस्वती निवजेकर यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग: आईलाच घराच्या बाहेर काढुन स्वताच्याच मुलाने आईला केले बेघर!हि घटना घडली आरोंदा रेडकरवाडी येथे.श्रीमती सरस्वती मधुकर निवजेकर या 80 वर्षे झालेल्या वयोवृध्द महीलेला स्वतःचा मुलगा मंगेश मधुकर निवजेकर याने आईला धक्के मारुन,शिवीगाळ करुन घरातुन बाहेर काढले आहे.याबाबत प्रशासनाकडे न्याय मागितला पण आरोंदा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री.राणे याने प्रत्येकवेळी आडमुटे धोरण घेत आहेत.

25 जानेवारीला हि महीला उपोषणाला बसणार होती.परतु पालकमंत्री नितेश राणे यांनी न्याय देतो म्हणुन सांगितले होते.परंतु या पत्राला प्रशासनाने दाद दिली नाही.सरस्वती मधुकर निवजेकर याने आपल्या नवऱ्याची जमिन विकुन आपले दागिने विकुन घर बांधून घेतले होते.मुलाने घर बांधले मात्र ते आपल्याच नावावर करून घेतले.व मला त्याने घरातुन बाहेर काढले आहे.याबाबत अर्ज देऊन सुध्दा आजपर्यंत कोणत्याही अधिकारी याने दखल घेतली नाही.त्यामुळे आज दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले असून,न्याय न मिळाल्यास मी आत्मदहन करणार असल्याचे सरस्वती निवजेकर याने एका लेखी तक्रारी निवेदनात म्हटले आहे.

मी मेलो तरी चालेल पण माझा नवऱ्याचे घर मला का मिळत नाही. मुलाने माझे घर बळकावले आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा अशी विनंती वयोवृद्ध सरस्वती निवजेकर या करत आहे.

error: Content is protected !!