एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची शासकीय विभागामध्ये निवड
सिंधुदुर्ग : महेंद्रा अकॅडमीची हॅट्रिक झाली असून एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांची शासकीय विभागामध्ये निवड झाली आहे.
महेंद्रा अकॅडमीचे सागर शिरसाट यांची एम.पी.एस.सी. मार्फत कृषी विभागामध्ये निवड झाली आहे. याशिवाय समीक्षा सोनवडेकर यांची एम.पी.एस.सी. मार्फत पोलिस अधीक्षक कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक म्हणून तर किरण गोसावी यांची लेखा व कोषागार, सिंधुदुर्ग पदी निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला पॅरा कमांडो हा महेंद्रा अकॅडमीमधून बाहेर पडला असून यापूर्वी अनेक विद्यार्थ्यांना महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून आपले स्वप्न साकारता आले आहे. यावेळी तर एकाच वेळी ३ विद्यार्थ्यांची शासकीय विभागात निवड झाली असल्यामुळे महेंद्रा अकॅडमीच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.














