मोती तलावाच्या काठावर बसलेला तरुण तोल जाऊन तलावात कोसळला

सावंतवाडी : येथील मोती तलावाच्या काठावर बसलेला तरुण तोल जाऊन तलावात कोसळला. मात्र सुदैवाने त्या ठिकाणी पोलिस आणि नागरिकांनी धाव घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले. ही घटना आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास येथील विश्रांती हॉटेल समोर घडली. सुभाष चव्हाण असे त्या युवकाचे नाव आहे. त्याला अधिक उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो नशेत असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

error: Content is protected !!