कुडाळ : रविवार दिनांक 13/04 /2025 रोजी गायन क्षेत्रातील मेरुमणी पंडीत श्री.अजित कडकडे साहेब यांनी माडयाचीवाडी येथील जिव्हाळा सेवाश्रमास सदीच्छा भेट दिली. श्री.प्रसाद पोईपकर यांनी जिव्हाळा सेवाश्रमास भेट देण्यासाठी श्री.कडकडे यांना विनंती करून त्यांना प्रवृत्त केले. बाबत श्री. पोईपकर यांना सुद्धा धन्यवाद.
सदर प्रसंगी जिव्हाळा सेवाश्रमाचे अध्यक्ष श्री.सुरेश बिर्जे यांनी त्यांचे स्वागत करून कु.गितांजली बिर्जे यांनी त्यांचे औक्षण केले. जिव्हाळा सेवाश्रमाचे कार्य , कामाचा वाढता पसारा, लाभार्थ्यांची निटनेटकी व्यवस्था,स्वच्छता टापटीप पणा पाहून श्री.कडकडे साहेबांनी समाधान व्यक्त केले. तसेच आपल्या हातून अशा प्रकारे समाजसेवा घडावी..अशी इच्छा व्यक्त केली.
पं.श्री अजित कडकडे साहेब जिव्हाळयात आल्याने लाभार्थ्यांनमध्ये चैतन्य निर्माण झाले.. जिव्हाळा सेवाश्रमाचे हे कार्य म्हणजे ईश्वराप्रती पोहोचण्याचा एक मार्गच असल्याचे त्यांनी अभिप्राय मध्ये नमूद केले. तसेच संस्थेचे कार्य पाहून ज्या ठिकाणी आपली गरज लागेल तेव्हा केव्हाही मला साद द्या असं आश्वसित केले.
सदर प्रसंगी श्री.अरुण परब,कु.प्राजक्ता परब तसेच त्यांचे कुटुंबीय तसेच श्र. संजय बिर्जे, श्री.उमेश देसाई, श्री.जयप्रकाश प्रभू,कु.गितांजली बिर्जे,सौ.राणी डोणकरी श्री.कुबल सर इत्यादी उपस्थित होते. कडकडे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्यानंतर अध्यक्ष श्री सुरेश बिर्जे यांनी आभार व्यक्त करत सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले…













