विवाहित महिलेचा छुपा पाठलाग करून तिच्याशी संपर्क करण्याचा तसेच वैयक्तिक ओळख वाढविण्यासाठी तिच्या मोबाईलवर ऑनलाईन असतेवेळी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निवती – मेढा उपसरपंच गोविंद विठोबा जाधव (35 ) याच्यावर निवती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. याबाबत त्या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी महिला काल सकाळी 10.25 वाजण्याच्या सुमारास एका दुकानावर जात असताना , संशयीत गोविंद जाधव तिच्या मागून छुपा पद्धतीने पाठलाग करू लागला आणि तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागला. तसेच तिच्याशी वैयक्तिक ओळख वाढविण्यासाठी ती महिला मोबाईलवर ऑनलाईन असतेवेळी तिला मेसेज पाठवायचा आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. याबाबत त्या महिलेने निवती पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानुसार गोविंद याच्या विरोधात भारतीय न्याय सहिता कलम 78 (1) (i) 78 (1) (ii) गुन्हा दाखल करण्यात आला. निवती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंढरीनाथ भांगरे अधिक तपास करीत आहेत.

महिलेचा पाठलाग केल्याप्रकरणी उपसरपंचावर गुन्हा दाखल
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90

Subscribe









