चेंदवण येथील सिद्धिविनायक बिडवलकर बेपत्ता प्रकरणी अखेर अपहरणाचा गुन्हा नोंद.

निवती पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना घेतले ताब्यात

मुख्य चौथ्या आरोपीलाही कोल्हापूर येथून घेण्यात आले ताब्यात..

सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणाचा कुडाळ व निवती पोलिसांकडून तपास हौता सुरू..

सिंधुदुर्ग :-कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर (वय 37) याच्या बेपत्ता प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद झाला असून निवती पोलिसांनी तीन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहेत.

ॲड.किशोर वरक यांनी सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर बेपत्ता प्रकरणी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे लक्ष वेधले होते. दोन वर्षापासून बेपत्ता असणाऱ्या सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरणाचा कुडाळ व निवती पोलिसांकडून तपास सुरू होता.

दरम्यान आज अखेर सिद्धिविनायक अंकुश बिडवलकर अपहरण प्रकरणी निवती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सिद्धिविनायक बिडवलकर याचे अपहरण झाल्यानंतर पुढे काय झाले याचा उलगडा आता पुढील तपासात होणार आहे.

error: Content is protected !!