नवीन गाड्यांसाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्याची आगार व्यवस्थापकांची ग्वाही
इन्सुली अपघातप्रकरणी चालकाला दोषी ठरवल्याने वैभव नाईक संतप्त
माजी आमदार वैभव नाईक व एसटी कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख अनुप नाईक यांनी एसटी कमर्चाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आज कुडाळ एसटी आगार व्यवस्थापक रोहित नाईक यांची भेट घेतली.यावेळी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान राज्य सरकार आणि एसटी महामंडळाकडून कुडाळ एसटी आगारासाठी एकही नवीन एसटी देण्यात आली नाही याबाबत वैभव नाईक यांनी आगार व्यवस्थापक यांना जाब विचारला. कुडाळ सारख्या महत्वाच्या आगारासाठी नवीन एसटी गाड्या मिळाल्याच पाहिजेत अशी भूमिका त्यांनी मांडली.यावेळी १० नवीन एसटी गाड्या मिळण्याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करण्याची ग्वाही आगार व्यवस्थापकांनी दिली.
त्याचबरोबर इन्सुली घाटात झालेल्या एसटी अपघातात प्रवाशांचे जीव वाचविणाऱ्या एसटी चालकालाच दोषी धरण्यात आले आहे. याबाबतही वैभव नाईक यांनी संतप्त होत आगार व्यवस्थापकांना जाब विचारला. नादुरुस्त गाड्या देऊन प्रवाशांचा जीव धोक्यात घालताय आणि त्याचे खापर चालकावर फोडताय हे चुकीचे असल्याचे सांगत याबाबत परिवहन मंत्री आणि विभाग नियंत्रक यांचे लक्ष वेधणार असल्याचे वैभव नाईक यांनी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक , शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, पपू म्हाडेश्वर, कामगार सेनेचे जिल्हा सचिव आबा धुरी, कुडाळ आगार अध्यक्ष दीपक भोगले, सचिव अमोल परब, एम. आर. दळवी, महेश वेंगुर्लेकर, भाऊ बोगार, सचिन ठाकूर, श्री. रासम, श्री. मोरे आदी उपस्थित होते.
1
/
36


बिडवलकर प्रकरणातील आरोपींवर मकोका लावावा - ऍड. किशोर वरक

शिंदे गटातील गटबाजीमुळे बिडवलकर प्रकरण उघड - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik

वैभव नाईक यांचा पलटवार | Vaibhav Naik #vaibhavnaik

वैभव नाईक हेच वाल्मीक कराड - रत्नाकर जोशी #vaibhavnaik

ऐतिहासिक रणरागिणी ताराराणी नाटक सिंधुदुर्गवासियांच्या भेटीला

तोपर्यंत मी उपोषणावर ठाम

वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांवर निलेश राणे यांचे चोख प्रत्युत्तर #nileshrane #vaibhavnaik

खवणे येथे गरमागरम भजीचा आस्वाद

खवणे बीच येथे घेतला कांदळवन सफरीचा आनंद

खवणे बीच येथे मूलभूत सोई - सुविधा उपलब्ध करावी; पर्यटकांची मागणी

कोकणचं पर्यटन गोव्याहून सुंदर - पर्यटकांची प्रतिक्रिया

सागरी जीव रक्षकांची मानधन वाढवून देण्याची मागणी
1
/
36
