शिवसेना समन्वयक सुनील पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
कणकवली – शिवसेना पक्षात उबाठा सेनेचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या २४ एप्रिल रोजी पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत या इच्छुक नेते व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार आहेत, अशी माहिती शिवसेना ( शिंदेगट ) चे समन्वयक सुनील पारकर यांनी दिली.
यावेळी ते कणकवली येथील शिवसेना ( शिंदेगट ) च्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, तालुका समन्वयक सुनील पारकर, महिला तालुकाप्रमुख प्रिया टेंबकर, उपतालुकाप्रमुख दामोदर सावंत आदी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना ( शिंदेगट ) पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. ११ एप्रिल रोजी जिल्हा नियोजन सभा असल्यामुळे जिल्हाप्रमुख दत्त सांनात यांनी कणकवली मतदारसंघात काही विकास कामे असल्यास यादी पाठवा, अशी मागणी केली. त्यामुळे या बैठकीत विकास कामांवर चर्चा करण्यात आली.
त्याचप्रमाणे अलीकडच्या काळात राजकीय दृष्ट्या काही मनभेद होते ते मिटले पाहिजेत यासाठी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची भेट घेणार आहोत. तसेच सिंधुदुर्ग – रत्नागिरी चे खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे, सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्या अभिनंदाचे ठरावा आयोजित बैठकीत घेण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाची वारंवार एक तक्रार येत होती. जिल्हा वारकरी सांप्रदायला जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ओरोस येथील रवळनाथ मंदिरात जिल्हा वारकरी सांप्रदयाचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात ना. उदय सामंत यांनी वारकऱ्यांना आश्वासन दिले होते. की, वारकऱ्यांना कार्यक्रमांसाठी छोटा हत्ती प्रदान करू. यावर दोन वर्षे कालावधी निघून गेल्यानंतर वेंगुर्ला येथे मुख्यमंत्री आपल्या दरी कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी सदरचा छोटा हत्ती जिल्हा वारकरी सांप्रदयला प्रदान करण्यात आला होता. मात्र तो टेम्पो काही वारकऱ्यांकडे पोहोचला नाही, अशी तक्रार आली. त्यांनतर शोधमोहीम घेतली गेली. यावेळी असे निदर्शनास आले की, भास्कर राणे यांनी तो छोटा हत्ती टेम्पो हळवल वारकरी सांप्रदाय पुरता मर्यादित ठेवला. दरम्यान ना. उदय सामंत आणि किरण सामंत यांचं जे उद्दिष्ट होत की, जिल्ह्यातील प्रत्येक वारकऱ्याला त्या टेम्पो चा लाभ घेता यावा आणि त्यांची सर्व कामे त्या टेम्पो मार्फत व्हावी. मात्र भास्कर राणे यांनी टेम्पो केवळ हळवल वारकरी संप्रदायासाठी दिला तो स्वतःच्या स्वार्थासाठी दिला ? की वरिष्ठांच्या निर्देशांनंतर केलं याच काही आम्हाला माहिती नाहीय. वारकरी संप्रदायाला दिलेला टेम्पो भास्कर राणे यांनी आपल्या नातेवाईकांच्या नावावर केला आहे. तो टेम्पो त्यांनी त्वरित वारकरी संप्रदायाच्या नावावर करावा, अशी मागणी सुनील परकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे. भास्कर राणे यांनी वारकरी संप्रदायाला दिलेल्या टेम्पो जर वारकरी संप्रदायाच्या नावावर केला नाही तर त्यांनी तस नाही केलं वरिष्ठांपर्यंत पोहोचवू, आणि जिल्हा वारकरी संप्रदायला न्याय मिळवून देऊ असे सांगितले.



Subscribe









