कुडाळ पोलीस स्टेशन ते आर.एस.एन. मुख्य रस्ता मजबुतीकरण व्हावे

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांची सा.बा. कडे मागणी

कुडाळ : नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी नगरपंचायत अधिकारी कुडाळ व सार्वजनिक बांधकाम अधिकारी सावंतवाडी यांच्यासह कुडाळ पोलीस स्टेशन ते आर.एस.एन. मुख्य रस्त्याची पाहणी केली. लवकरात लवकर या रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यावेळी सांगण्यात आले.

कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये कुडाळ पोलिस ठाणे चौक ते हॉटेल आर.एस. एन चौक कडे जाणारा मुख्यरस्ता हा आपले विभागाच्या मालकीचा असून सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. विषयांकीत रस्ता हा कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मुख्य रस्ता असून सदर रस्त्यामधून मोठ्या प्रमाणात वाहतुक वर्दळ सुरु असते. तसेच विषयांकीत रस्ता हा संत राऊळ महाराज महाविद्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता असून रस्त्यावरुन महाविद्यालयीन मुले-मुली यांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु असते.

सद्यस्थितीमध्ये रस्त्याचा पृष्ठभाग खराब झाल्याने वाहतुक व रहदारी करणे अत्यंत जिकरीचे होत आहे. एकंदरीत रस्त्यास पडलेल्या खड्यांमुळे अपघात घडून जिवित व वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विषयांकीत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडे मोठ्या प्रमाणात नागरीकांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सदर रस्त्याचे डांबरीकरण मजबुतीकरण करणे आवश्यक असून पावसाळा कालावधीपुर्वी तातडीने विषयांकीत रस्त्याचे डांबरीकरण मजबुतीकरण करुन घेणेत यावे तसेच पावसाळी पाणी योग्य प्रकारे निचरा होण्याकरीता रस्त्याच्या दुतर्फा गटर खोदाई करुन पावसाळी पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. अशी मागणी नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली. तर लवकरात लवकर या रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले.

error: Content is protected !!