कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन
संतोष हिवाळेकर / पोईप
कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांचा २६ मार्च रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.तर २६ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,मालवण विधानसभा प्रमुख संग्राम प्रभुगावकर,महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव,जिल्हाप्रमुख श्रेया परब, हरी खोबरेकर, राजन नाईक, कन्हैया पारकर,बबन बोभाटे, मंदार ओरसकर, योगेश धुरी,दीपा शिंदे पूनम चव्हाण, स्नेहा दळवी, मथुरा राऊळ यांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवतीसेना पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व सिंधुदुर्ग जिल्हावासीयांकडून वैभव नाईक यावेळी शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागाच्या वतीने वैभव नाईक चषक ओव्हरआर्म लीग क्रिकेट स्पर्धा २३ ते २५ मार्च या कालावधीत आचरा भंडारवाडी मैदानावर आयोजीत करण्यात आली आहे. शिवसेना सुकळवाड - पोईप विभागाच्या माध्यमातून विरण बाजारपेठ वाडकर मैदान येथे २५ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता नेरूर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रम होणार आहे.
शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने २५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता सिद्धिविनायक हॉल कुडाळ येथे खेळ पैठणीचा कार्यक्रम व सायंकाळी ५ वाजता केक कापून वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. शिवसेना ओरोस च्या वतीने २५ मार्च रोजी रात्री ८ वाजता ओरोस येथील रवळनाथ मंदिर सभागृह येथे छावा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
शिवसेना माणगाव विभागाच्या वतीने बाळा म्हाडगुत कॉम्प्लेक्स, बाजारपेठ माणगाव येथे २६ मार्च रोजी सकाळी ०९ वा. रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे.शिवसेना नानेलीच्या वतीने २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता नानेली घाडीवाडी येथे रक्तदान शिबीर व रात्रौ ८ वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. शिवसेना आडवली मालडी विभागाच्या वतीने २६ मार्च रोजी सकाळी १० वा. हिवाळे प्रा.आ. केंद्रात रुग्णांना फळवाटप करण्यात येणार आहे. आणि आकेरी बाजारपेठ येथे शिवसेनेच्या वतीने २७ मार्च रोजी रात्री ८.३० वा. छावा चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
त्याचप्रमाणे वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार २२ मार्च रोजी नाणेली येथे शिवसेनेच्या वतीने नागरिकांना छावा चित्रपट दाखविण्यात आला. कुंभवडे युवा प्रतिष्ठानच्या वतीने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच शिवसेना पेंडूर विभागाच्या वतीने श्री. शिवाजी विद्यामंदिर काळसे येथे आज २३ मार्च रोजी सकाळी रक्तदान शिबीर घेण्यात आले.
1
/
76
पिंगुळी देऊळवाडी येथे पाझर तलावाजवळ होत असलेल्या प्रकल्पावर निर्बंध आणावा - जीजी उपरकर
आमच्याकडून कणकवली भयमुक्त करून लोकशाही प्रस्थापित केली जाईल - संदेश पारकर #kankavali
विजयानंतर राजन गिरप यांची प्रतिक्रिया #vengurla
कणकवलीच्या भूमीत चालत असलेला उन्मत्तपणा कणकवलीकरांनी गाढून टाकला
हे फळ मिळत असेल तर कार्यकर्ते काम करताना विचार करतील - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
चौकूळ ग्रामदैवत श्री. देवी सातेरी व भावईच्या वार्षिक जत्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत
डॉक्टरांकडून गैरफायदा घेतला जात असेल तर शासन नक्की होणार – नितेश राणे | Nitesh Rane #kankavali
मी स्वतःही झोपणार नाही आणि समोरच्याची पण झोप उडवणार | Nilesh Rane #nileshrane
आमदार निलेश राणे यांनी फलटणमध्ये सभा गाजवली | Nilesh Rane #nileshrane
५०० रुपयांसाठी त्या डॉक्टरने कानातली कुडी काढून घेतली #kankavali #sindhudurg
महिला डॉक्टरने समुदायावर चप्पल फेकल्यामुळे पुढील प्रकार घडला #kankavali #sindhudurg
केन एन बेक कॅफे कुडाळला भेट द्या आणि पेस्ट्रीचा मोफत आस्वाद घ्या #kudal #sindhudurg
1
/
76



Subscribe









