आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रमाचे विरण बाजारपेठ येथे आयोजन

सुकळवाड-पोईप जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रोंबाट कार्यक्रमाचे आयोजन

संतोष हिवाळेकर / पोईप

कुडाळ-मालवणचे माजी. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड-पोईप जिल्हापरिषदेच्या माध्यमातून दिनांक २५-०३-२०२५ रोजी रात्री ठिक ८.३० वाजता नेरुर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रमाचे आयोजन विरण बाजारपेठे वाडकर मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे.


या रोंबाट कार्यक्रमामध्ये सादर होणारे देवदेवता, राक्षस, प्राणी पक्षी यांचे चलचित्र असणारे देखावे यांच्या बरोबर पारंपरिक वेशभूषा केलेली सोंग यामध्ये प्रामुख्याने मारुती, राक्षस, भूत, सिंह, मगर तसेच इतर सोंगे तसेच हातात लेझीम घेऊन असणारी लहान मुले असतात. या सर्वांचे सुश्राव्य संगीत साथीवर होत असणारे नृत्य व सादरीकरण हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण असून या रोंबाट कार्यक्रमाचा लाभ सर्व रसिक प्रेक्षकांनी घ्यावा असे आवाहन सुकळवाड-पोईप जिल्हा परिषद शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!