वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रवाबाबत विचारविनिमय आणि करण्यासाठी तातडीची बैठक

कुडाळ : आपल्या भागातील वन्यप्राण्यांच्या वाढता उपद्रव, शेती नुकसानी तसेच नागरिकांवरील हल्ल्याबाबत विचार विनिमय आणि उपाययोजना करण्यासाठी सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीसाठी मान. एस. नवकिशोर रेड्डी,उपवनसंरक्षक, सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे मान.विरसिंग वसावे, तहसीलदार कुडाळ हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
तरी पणदूर, अणाव, वेताळ बांबर्डे, हुमरमळा, डिगस आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व शेतकरी आणि ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

बैठकीची वेळ :- शनिवार २२ मार्च रोजी सकाळी ११.० वाजता

बैठकीचे ठिकाण :- मांगल्य मंगल कार्यालय, वेताळ बांबर्डे.

error: Content is protected !!