गोळवण कुंभादेवीवाडी येथील कु.लतिका दीपक सावंत हीची विमानाने इस्रो भरारी……!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या च्या वतीने करण्यात येणार सत्कार

मालवण : श्री. देवी शांतादुर्गा भंडारी हायस्कूल वडाचापाटची माध्यमिक प्रशालेतील कु.लतिका दीपक सावंत गोळवण- कुंभादेवीवाडी या विद्यार्थ्यांनीची निवड सिंधुदुर्ग जिल्हा परिषद यांनी आयोजित केलेल्या इस्रोच्या अभ्यास व संशोधन शैक्षणिक सहलीसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. स्वतः प्रयत्न पूर्वक अभ्यास करून गोळवण गावाच्या इतिहासात मानाचा तुरा खोवला.
गोळवण गावातील कुंभादेवीवाडी येथील कु. लतिका दीपक सावंत हिने अतिशय कठीण परिस्थितीतुन संघर्ष करुन गुणवत्ता मिळवत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये आपले अव्वल आठ विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. कु. लतिका दीपक सावंत यांच्या घरची परिस्थिती बेताची आहे आईवडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. लतिका प्रचंड मेहनत करून अहोरात्र अभ्यास करुन आईवडिलांच्या संस्कारुपी आशीर्वादाच्या जोरावर अतिशय खडतर परिस्थितीचा सामना करत अनेकदा आपल्या गुणवत्तेनं आपला ठसा उमटवला आहे. अभ्यासामध्ये तर ती गुणवान आहेच. पण ती कला, क्रिडा,अभिनय, वक्तृत्व अशा सर्व गुणांच्या बाबतीतही गुणवान आहे.


आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता नंतर तालुका स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला होता. लतिकाचे जहाल वक्तृत्व आणि गुणवत्ता वाखाणण्याजोगी आहे.


आज या गोळवण गावच्या सुकन्येनं आपल्या अलौकिक गुणवत्तेच्या जोरावर चक्क विमान प्रवास करत इस्रो वारीसाठी प्रयाण केले आहे. गोळवण गावच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी ठेवावा असा आजचा दिवस आहे.
अशा झेप घेणाऱ्या पंखांना बळ देण्यासाठी आपण समस्त गोळवणवासियांनी पुढे यायला हवे.


लवकरच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या विद्यार्थ्यांनीचा सत्कार करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!